
सचिन शिंदे
कऱ्हाड ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कऱ्हाड तालुक्यातील सव्वालाख महिलांना दरमहा एक हजार ५०० प्रमाणे अनुदान मिळते. या योजनेत संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी महिलाही लाभ घेत आहेत. त्याची तहसीलदार कार्यालयातर्फे छाननी सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात लाडकी बहीण, की निराधार योजना? यापैकी एका योजनेचा लाभ महिलांना घ्यावा लागणार आहे. निराधार योजनांचे १२ हजार ४५६ लाभार्थी आहेत. त्यात ६० टक्के महिला आहेत. त्यांना त्याचा फटका बसणार आहे.