esakal | सुयश धनावडेची अनोखी देशभक्ती; गणेशोत्सव देखाव्यात ऑलम्पिक विजेत्यांचे छायाचित्र लावून केले सन्मान
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh utsav

गणेशोत्सव देखाव्यात ऑलम्पिक विजेत्यांचे फोटो लावून अनोखी देशभक्ती

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर: खरं तर गणेशोत्सव म्हणजे सर्वत्र मोठ्या भक्तीभावाने व उत्साहाने साजरा केला जातो. मराठी माणूस गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा करत असतो. बाळ गोपाळांच्या श्रद्धा व भक्तीला गणेशोत्सव कालावधीत उधाण आलेले असते. गणेशोत्सव दरम्यान आपापल्या परीने देखावे, सजावट करून बाप्पांची पूजा केली जाते.

हेही वाचा: जेलफोडोचा प्रसंग अभिमानास्‍पद, आदर्शवत : वैभव नायकवडी

जावळी तालुक्यातील मामुर्डी येथील सुयश सुनील धनावडे या युवकाने यंदाच्या गणेशोत्सवात टोकियो ऑलम्पिकमध्ये पदके मिळवणाऱ्या पदक विजेत्या खेळाडूंची छायाचित्रे गणेशोत्सव देखाव्यात लावून, अनोख्या प्रकारे आपली देशभक्ती दाखवून दिली आहे. देशासाठी पदक मिळवणाऱ्या या खेळाडूंचा सन्मान सुयशने केला आहे. दरवर्षी सुयश हा गणेशोत्सव देखाव्यात नवनवीन कल्पना राबवत असतो. ज्या खेळाडूंमुळे देशाचे नाव जगात गाजले. त्या खेळाडूंच्या पराक्रमाची ओळख ग्रामीण भागात व्हावी, म्हणून सुयशने हा देखावा साकारला आहे.

या देखाव्यात नीरज चोप्रा, रवी कुमार दहीया, मीराबाई चानू, पी. व्ही. सिंधू, लोवलीना बोर्गोहेन, बजरंग पुनिया व हॉकीत कांस्य पदक मिळवलेल्या खेळाडूंची छायाचित्र या देखाव्यात आहेत. ग्रामीण भागात देशाभिमान वाढण्यासाठी सुयश धनावडे याने अभिनव उपक्रम राबविला असून त्याच्या या देखाव्याचे कौतुक होत आहे.

"मला खेळांची प्रचंड आवड असून मी सैन्य भरतीसाठी मेढयातील शौर्य करियर अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत. देशाचे नाव उज्वल करणाऱ्या या खेळाडूंचे स्मरण व त्यांची अतुलनीय कामगिरी ग्रामस्थ व युवकासमोर यावी, म्हणून मी खेळाडूंचे फोटो गणेशोत्सव देखाव्यात लावले आहेत."- सुयश धनावडे, मामुर्डी

loading image
go to top