'स्वाभिमानी'ने घातला 'दहावा'; जिल्हा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

उमेश बांबरे
Saturday, 17 October 2020

दहा दिवसांपासून आम्ही आंदोलन करत आहे. पण, त्याची साधी दखलही प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे आंदोलनाचा दहावा दिवस म्हणून आम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्व यंत्रणांसह ऊसबिल थकविणाऱ्या कारखाना व्यवस्थापनाचा निषेध नोंदविण्यासाठी ऊस पूजन करून दहावा घातला असल्याचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी सांगितले.

सातारा : किसन वीर साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे 35 कोटी रुपयांचे थकीत बिल द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला दहा दिवस होऊनही कारखाना व्यवस्थापनाने थकीत पैसे वर्ग केलेले नसल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी दहावा घालून निषेध नोंदविला. तसेच कारखान्याकडे थकीत रक्कम शेतकऱ्यांना दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे "स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी स्पष्ट केले. 

श्री. शेळके म्हणाले, "दहा दिवसांपासून आम्ही आंदोलन करत आहे. पण, त्याची साधी दखलही प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे आंदोलनाचा दहावा दिवस म्हणून आम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्व यंत्रणांसह ऊसबिल थकविणाऱ्या कारखाना व्यवस्थापनाचा निषेध नोंदविण्यासाठी ऊस पूजन करून दहावा घातला. 

साताऱ्यात धनगर समाजाचा रास्ता रोको; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

मध्यंतरी "किसन वीर'च्या व्यवस्थापनाने एक कोटी रुपये देऊन शेतकऱ्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही कारखान्याला तोडगा दिला आहे. 35 कोटी थकीत असूनही दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर टाका, आम्ही आंदोलन तूर्त स्थगित करू.'' या आंदोलनात अर्जुनराव साळुंखे, देवानंद पाटील, दादासाहेब यादव, रमेश पिसाळ, महादेव डोंगरे, राजेंद्र बर्गे, मामा कणसे, पदाधिकारी, कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani Sanghatana Agitation In Front Of President Madan Bhosales House Satara News