कऱ्हाड : शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज येथे काळी गुढी उभारून केला. येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शासनासह उपमुख्यमंत्री पवार यांच्या निषेधार्थ काळी गुढी उभारण्याच्या प्रयत्नात असताना आंदोलक व पोलिसात झटापट झाली. आंदोलनकर्त्यांकडून गुढी काढून घेताना पोलिसांनी बळाचा वापर केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.