Video : अन् स्वाभिमानीच्या आंदोलकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

हेमंत पवार
Wednesday, 22 July 2020

दरम्यान, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी तत्काळ घटनास्थळी फौजफाटा तैनात केला. दरम्यान, संबंधित आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
 

कऱ्हाड : दुधाला दरवाढ मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे-बंगळूर महामार्गावर आंदोलन केले. महामार्गावर वाठार (ता. कऱ्हाड) येथे दुधाच्या टॅंकरचालकाला दुधाचा अभिषेक घालून दूध दरवाढीची जोरदार मागणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत केली.
...इथं चित्र बघून साकारतात गणेशमूर्ती
 
खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारने दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा, दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, दूध पावडरला प्रतिकिलो 30 रुपये निर्यातीसाठी सबसिडी द्यावी, दूध हे शेतकऱ्यांचे उत्पादन असल्याने दूध पावडर, तूप, आम्रखंड, श्रीखंडावरील 12 टक्के जीएसटी रद्द करावी, पुढील तीन महिन्यांत वाढणाऱ्या दुधाचा विचार करून सरकारने पुढील तीन महिने दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये जमा करावेत आदींसह दुधाच्या दरवाढीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानुसार स्वाभिमानीच्या कऱ्हाड तालुक्‍याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुधाच्या दरवाढीसाठी महामार्गावर उतरून सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

सातारा जिल्ह्यात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षानंतर एका पालिकेच्या नगराध्यक्षांनाही काेराेनाची लागण झाली आहे 

नाे एन्ट्री...अन्यथा तुम्हांला 'या' गावात श्री शंभू महादेवाचे दर्शन पडेल हजार रुपयांना

महामार्गावर अचानक वाठार येथे आंदोलक उतरल्याने पोलिसांची धावपळ उडाली. आंदोलनकर्त्यांनी कोल्हापूरकडून मुंबईकडे निघालेल्या दुधाचा टॅंकर वाठार येथे अडवला. दूध टॅंकरचालकाला खाली उतरवून त्याला दुधाचा अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर त्यांनी दुधाला दरवाढ मिळालीच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी तत्काळ घटनास्थळी फौजफाटा तैनात केला. दरम्यान, संबंधित आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Edited by : Siddharth Latkar

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani Shetkari Sanghtana Agitation For Rate Of Milk