
कोरेगाव : सर्वाधिक काळ सरपंचपद भूषविण्याचा विक्रम तडवळे संमत कोरेगाव (ता. कोरेगाव) येथील झांजुर्णे कुटुंबाने केला आहे. या एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांनी तब्बल ५३ वर्षे तडवळे संमत कोरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काम पाहिले आहे. त्यामुळे या कुटुंबाची सर्वाधिक काळ सरपंचपद भूषविल्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.