
सातारा : शेतात सेंद्रिय हिरवळीचे खत तयार करण्यासाठी ताग व धैंचा या पिकांचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यासाठी जिल्हा परिषदेने यंदापासून सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ताग, धैंचाच्या खत बियाण्यांसाठी अनुदान जाहीर केले आहे. मात्र, ही दोन्ही बियाणे बाजारात अल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना बियाणे मिळविताना अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांना बियाणेच मिळविताना कसरत करावी लागते, तर अनुदान कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.