घोटाळ्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा : भारत पाटणकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोटाळ्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा : भारत पाटणकर

घोटाळ्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा : भारत पाटणकर

सातारा (कोयनानगर) : कोयना धरणग्रस्तांचे पात्र खातेदारांचे संकलन तयार करून त्यांच्या १०० टक्के पुनर्वसनाची मागणी श्रमिक मुक्ती दलाने लावून धरली आहे. त्यातून धरणग्रस्तांच्या पर्यायी जमिनीत झालेला गैरव्यवहार उजेडात आला आहे.

सहा हजार खातेदारांना नोटीस गेल्या आहेत. कोयनेच्या पर्यायी जमीन वाटपात झालेल्‍या घोटाळ्यात जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व कोयना धरणग्रस्तांनी केली आहे.

कोयना धरणग्रस्तांची राज्यव्यापी बैठक येथील मारुती मंदिरात डॉ. पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. श्रमिक मुक्ती दलाचे हरिश्चंद्र दळवी, बळीराम कदम, चैतन्य दळवी, महेश शेलार, श्रीपत माने, तानाजी बेबले, रामचंद्र कदम, सीताराम पवार आदी उपस्थित होते. डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘सहा वर्षांपासून कोयना धरणग्रस्तांच्या १०० टक्के पुनर्वसनाचा प्रश्न संघटनेने आंदोलनाच्या माध्यमातून हातात घेतला आहे. या सहा वर्षांत हे प्रश्न सोडविण्यासाठी ९९ टक्के विजय मिळाला आहे. संघटनेच्या मागणीमुळे सहा वर्षांत प्रशासनाने बोगस प्रकल्पग्रस्त शोधले आहेत. खऱ्या वंचित व पात्र असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना येत्या मार्चपर्यंत पर्यायी जमिनी वाटप कराव्यात, कोयनेच्या पर्यायी जमीन वाटपात झालेल्‍या घोटाळ्यात जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.’’

loading image
go to top