
कऱ्हाडला दुकाने, मॉल, कार्यक्रमात दोन लसीचे डोस घेतलेल्यांनाच प्रवेश
कऱ्हाड - सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व हॉटेल, व्यावसायीक, मॉल, समारंभ, संमेलन, मेळावे या ठिकाणी दोन लसीचे डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा. संबंधित हॉटेल व व्यावसायीकांना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येईल, असे फलक लावावे, अशा सुचना प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार विजय पवार यांनी दिल्या.
कऱ्हाड तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व हॉटेलचे चालक-मालक, व्यावसायीक, मॉलचे चालक आदींची बैठक तहसीलदार कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, मलकापुरचे मुख्याधिकारी, बांधकाम, महावितरण, उत्पादन शुल्क विभागासह सर्व शासकीय कार्यालयांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. प्रांताधिकारी दिघे म्हणाले, पालिका, ग्रामपंचायत, पंचायत समितीने सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व हॉटेल, व्यावसायीक, मॉल, समारंभ, संमेलन, मेळावे या ठिकाणी दोन लसीचे डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येईल याची जनजागृती घंटागाड्यांच्या माध्यमातुन करावी.
हेही वाचा: कऱ्हाड-पुणे एसटी बस सुरु; प्रवाशांतून समाधान
या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी महसुल विभाग, पोलिस अधिकारी, गटविकास अधिकारी, पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित प्रशासकीय विभाग यांनी करावी. तहसीलदार श्री. पवार म्हणाले, १८ वर्षावरील ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांनी तात्काळ ती जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्रात जावुन घ्यावी, असेही आवाहन तहसीलदार श्री. पवार यांनी केले.
Web Title: Taken Two Doses Vaccine Can Enter Karad Shops Malls And Events
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..