

Satara education department administrative action
Sakal
सातारा: प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेत दुर्गम भागातील काही शिक्षकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. दुर्गम भागात सेवा बजावलेल्या काही शिक्षकांना दिवाळीत बदलीचे आदेश देऊनही कार्यमुक्त केले नसल्याने या प्रकरणाला दै. ‘सकाळ’ने वाचा फोडली. या बातमीची दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ पावले उचलत दुर्गममधील शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला. यासाठी परजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना संबंधित ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देऊन त्या शाळेतील शिक्षकांना कार्यमुक्त केले जात आहे.