
म्हसवड : पळशी (ता. माण) येथील शिक्षिकेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी एकास म्हसवड पोलिसांनी दोन तासांत अटक केली. मनोज सुरेश घमंडे (वय ४०, रा. धामणी) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून एक लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.