
सातारा : दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून धमकावण्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी शहर परिसरात एका १८ वर्षांच्या मुलाने केला. शहर पोलिस ठाण्यातील पोलिस व स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान व धाडस दाखवत संबंधित मुलीला त्या युवकाच्या ताब्यातून सोडविण्यात यश मिळवले. त्यानंतर जमावाने संबंधित मुलाला चांगलाच चोप दिला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होती.