esakal | सातारा जिल्ह्यातील दहा कोरोना बाधितांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

सातारा जिल्ह्यात 233 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबरोबरच 10 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील दहा कोरोना बाधितांचा मृत्यू

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : सातारा जिल्ह्यात 233 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबरोबरच 10 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोनाबाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 6, मंगळवार पेठ 1, गुरुवा पेठ 1, एकता कॉलनी 1, उत्तेकर नगर 1, शाहुपुरी 1, शाहुनगर 1,  सदरबझार 5, शनिवार पेठ 1, रविवार पेठ 1, गणेश चौक 1, विक्रांतनगर 1, संभाजीनगर 3, शिवशक्तीनगर 1, भवानी पेठ 1, गुरुकृपा 1, नागठाणे 2, सैदापूर 2, जकातवाडी 1,  शेरेवाडी 1, पाडही 1, धोंडेवाडी 2, वेणेगाव 1, सोनावडी 1, लिंब 1, किन्हई 1, पिंपळवाडी 3, देगाव 2, गोडोली 1, किडगाव 1, वाढे 1, पिरवाडी सातारा 1, गणेशगनर 1, यादोगोपाळ पेठ 1, नेले 1,  करंजे पेठ 1, पिलेश्वर नगर 1, आरफळ 1, खेड 3, कृष्णानगर सातारा 1.  

कराड तालुक्यातील कराड 4, शनिवार पेठ 2, सोमवार पेठ 1, गोटे 1, ओगलेवाडी 1, आने 2, शेणोली 1, मलकापूर 2, वाडोली भिकेश्वर 1, वडगाव हवेली 1, नारायणवाडी 1, कर्वे नाका 1. फलटण तालुक्यातील बुधवार पेठ 1, लक्ष्मीनगर 2, तरडगाव 3, कोळकी 1, सोमंथळी 1, सस्तेवाडी 1,  ढवळेवाडी 1, हिंणगाव 1, खुंटे 1, सांगवी 1.

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, पाचगणी 1. वाई तालुक्यातील गंगापूरी 2, रविवार पेठ 1, बोपेगाव 2, सुरुर 1, पसरणी 1, मेणवली 1, एकसर 2.   
खटाव तालुक्यातील सिंहगडवाडी 1, सिध्देश्वर कुराली 1, पुसेगाव 1, वडूज 6, बुध 2, पुसेगाव 2, वडगाव 2, ढेबेवाडी 2, पळसगाव 1, कातरखटाव 1, साठेवाडी 3, गोपुज 1.  
माण तालुक्यातील दहिवडी 2, मलवडी 1, गोंदवले बु 1, म्हसवड 9, बिदाल 3, दिवडी 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, अपशिंगे 1, वाठार किरोली 2, साप 1, नांदगिरी 17, खेड 1,  जांब खुर्द 1, धामणेर 1,  आर्वी 1, वाघोली 1, नागझरी 1, गोगावलेवाडी 1, खडखडवाडी 1, करंजखोप 1, देऊर 1,रहिमतपूर 4, एकसळ 1, तांदूळवाडी 1, कण्हेर खेड 1.  पाटण तालुक्यातील चोपदरवाडी 1, तारळे 1, चाफळ 1. जावली तालुक्यातील जावली 1.  इतर 1, जांबे 2, खडकी 1,  चोरगेवाडी 1, कोळी अळी 1, चाहुर 1. बाहेरील जिल्ह्यातील  सांगवी (बारामती) 1, चंद्रपुर 1, अकलूज 1,

दहा जणांचा मृत्यू 

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये सदरबझार सातारा येथील 75 वर्षीय महिला, कुडाळा ता. जावली येथील 70 वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये येरफळे ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, नाडवळ ता. खटाव येथील 50 वर्षीय पुरुष, समर्थनगर ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, उशिरा कळविलेले कुडाळ ता. जावली येथील 65 वर्षीय महिला, सुरली ता. कोरेगाव येथील 48 वर्षीय पुरुष, भोगवली ता. जावली येथील 82 वर्षीय पुरुष, तरडगाव ता. फलटण येथील 42 वर्षीय महिला, दारेवाडी ता. वाई येथील 55 वर्षीय पुरुष अशा 10 एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले