

Molestation Case Triggers Tension in Karad, Police Register Multiple Offences
Sakal
कऱ्हाड : येथील प्रीतिसंगम घाटावर अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून धार्मिक शिक्षण देणाऱ्यास झालेल्या बेदम मारहाणीने कऱ्हाड शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शनिवारी रात्री झालेल्या या घटनेबाबत अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची फिर्याद तिच्या आईने दिली आहे. त्यावरून पोक्सो कायद्यानुसार कारी शेरखान सिराज नदाफ (वय ३५, रा. बैलबाजार रस्ता, मलकापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तर त्यास मारहाण केल्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.