
-भाऊसाहेब जंगम
हुमगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या नागरी सत्कारादिवशीच मेढ्यात भाजपचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी माथाडी कामगार दत्तात्रय भालेघरे यांच्यावरील अन्यायाविरोधात निषेध मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. ऐन वेळी पोलिस प्रशासनाने मानकुमरेंच्या मोर्चाला परवानगी जरी नाकारली असली, तरी देखील जावळीत राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येणार काय? अशी शंका व्यक्त होत असतानाच, सत्कारावेळीच अन्यायार्थ मोर्चा काढण्याचा अर्थ काय? असा प्रश्नही जावळीकरांकडून उपस्थित होत आहे.