esakal | टेंभू प्रकल्पबाधितांना तातडीने भरपाई द्या; 'बळिराजा'चे अधिकाऱ्यांना साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

टेंभू प्रकल्पबाधितांना भरपाई द्या; 'बळिराजा'चे अधिकाऱ्यांना साकडे

काही शेतकऱ्यांना अजून भरपाई मिळाली नाही. त्यांना तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी निवेदनाद्वारे टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांना दिला.

टेंभू प्रकल्पबाधितांना भरपाई द्या; 'बळिराजा'चे अधिकाऱ्यांना साकडे

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा): टेंभू प्रकल्प होऊन अनेक वर्षे झाली तरीही टेंभू, गोवारे, कऱ्हाड, सैदापूर, गोटे, सुपने आदी गावांतील शेतजमीन पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याचा अनेक बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे; परंतु काही शेतकऱ्यांना अजून भरपाई मिळाली नाही. त्यांना तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी निवेदनाद्वारे टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांना दिला.

हेही वाचा: कऱ्हाड : उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरा- प्रहार संघटना

निवेदनातील माहिती अशी, टेंभू प्रकल्प होऊन गेली २० वर्षे झाली. या प्रकल्पामुळे टेंभू, गोवारे, कऱ्हाड, सैदापूर गोटे, सुपने आदी गावांतील शेतजमीन पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. सरकारच्या वतीने बऱ्यापैकी बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे; परंतु काही शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही. याबाबत राहिलेल्या बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला मिळावा, यासाठी कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना मान्यता मिळाली, की उर्वरित सर्व बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे. लवकरच बाधित शेतीची मोजणीचे काम सुरू केले जाणार असल्याचे रेड्डीयर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: कऱ्हाड: सरपंच परिषदेची कार्यकारिणी जाहीर

त्यासंदर्भात जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विषयी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती दिली आहे. त्यांनीही मी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले असून, योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी ग्वाही दिली आहे. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, सागर कांबळे, विश्वास जाधव, पोपटराव थोरात व शेतकरी उपस्थित होते.

loading image
go to top