esakal | कऱ्हाडात लस देताच चक्कर आलेल्या महिलेला डॉक्‍टरांकडून 'जीवदान'

बोलून बातमी शोधा

Doctor
कऱ्हाडात लस देताच चक्कर आलेल्या महिलेला डॉक्‍टरांकडून 'जीवदान'
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : येथील शाळा क्रमांक तीनमध्ये लस घेतल्यानंतर चक्कर येऊन महिला कोसळली. त्या वेळी तेथे असलेल्या डॉ. दिलीप सोलंकी यांनी प्रसंगावधान दाखवत त्या महिलेवर वेळीच त्वरित उपचार केल्याने त्या महिलेस जीवदान मिळाले. अवघ्या अर्धा तासांत त्या महिलेची प्रकृतीत सुधारणा झाल्याने यंत्रणेने निश्वास टाकला.

येथील शाळा क्रमांक तीनमध्ये लसीकरण केंद्र आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास पन्नाशीतील महिला तेथे लसीकरणासाठी आली. तिला लस देण्यात आली. लस देताच काही मिनिटांत तिला चक्कर आली अन्‌ ती खाली कोसळली. डॉ. सोलंकी यांना महिलेवर त्वरित उपचार सुरू केले. तिचा रक्तदाब, साखर तपासली. तिचे पल्सही तपासले. त्यानंतर तिला त्वरीत सलाईन लावले. त्याशिवाय काही इंजेक्‍शन दिले. त्यानंतर काही मिनिटात महिला शुद्धीवर आली. डॉ. सोलंकी यांनी प्रसंगावधान राखून त्वरित उपचार केल्याने पुढील अनर्थ टळून त्या महिलेचे प्राणही वाचले.

तांबवेतील नंदकिशोरचा राजधानीत झेंडा; दिल्लीत पहिल्याच प्रयत्नात 'यश'

Edited By : Balkrishna Madhale