esakal | सावधान! ग्रामीण भागात पुन्हा कोरोना वाढतोय; कऱ्हाडातील उंडाळेत कहर
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

उंडाळे विभागातील अनेक गावांत कोरोनाने आपले हातपाय पसरण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे.

सावधान! ग्रामीण भागात पुन्हा कोरोना वाढतोय

sakal_logo
By
जगन्नाथ माळी

उंडाळे (सातारा) : विभागातील अनेक गावांत कोरोनाने (Coronavirus) आपले हातपाय पसरण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. प्रत्येक गावात किमान दहा ते वीस कोरोना रुग्ण मिळून येत आहेत. तो रोखण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने विलगीकरण कक्षात दाखल करणे गरजेचे आहे. उंडाळेच्या डोंगरी भागात गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असून, काले, उंडाळे, येळगाव, टाळगाव, घोगाव यासह गावात दररोज कोरोना बाधितांची (Corona Patient) आकडेवारी वाढत आहे. (The Incidence Of Coronavirus Increased In Undale Division Of Karad Taluka Satara Marathi News)

कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासण्या वाढवल्याने बाधित येणारा रुग्ण हा शासनाने गाववार तयार केलेल्या विलगीकरण कक्षात दाखल होण्याऐवजी तो रुग्ण घरीच राहात आहे. त्यातच तो कोरोनाबाधित असला तरीही तो काही वेळा फिरतो. त्याचा विचार करून तातडीने त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करणे गरजेचे आहे. प्रशासनाने कोरोनाबाधित रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होत नसेल, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून संबंधिताला विलगीकरण कक्षात दाखल करण्याची गरज आहे. विविध गावांमधून विलगीकरण कक्ष निर्माण केली आहेत; पण या विलगीकरण कक्षात सध्या माहिती घेता बहुतांश विलगीकरण कक्ष केवळ दिखाऊपणा पुरतेच आहेत. त्यामध्ये कोणतेही रुग्ण दाखल झालेले दिसत नाहीत. प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष निर्माण केले आहेत; पण कक्षात मात्र काहीच रुग्ण दाखल नसल्याचेही चित्र कऱ्हाड तालुक्यात आहे.

हेही वाचा: ग्रामीण भागात कहर! टाकेवाडीला कोरोनाचा घट्ट विळखा

रुग्णालयात जागाच नाही

कोरोनाबाधित रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी जागा उपलब्ध नसून उंडाळे येथील ३० खाटांचे रुग्णालय सातत्याने ‘हाउसफुल्ल’ असते. कृष्णा रुग्णालयातही जागा उपलब्ध होत नाहीत. इतर ठिकाणी तीच परिस्थिती असल्याने कोरोनाच्या रुग्णाला दवाखान्याऐवजी विलगीकरण कक्षात उपचार करून त्याला बरा करणे गरजेचे आहे. विलगीकरण कक्षात रुग्णांची प्रकृती बिघडली किंवा त्याला जास्त त्रास झाला तर दवाखान्यात जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

The Incidence Of Coronavirus Increased In Undale Division Of Karad Taluka Satara Marathi News

loading image