esakal | कऱ्हाड पालिका: वीज कंपनीत उडणार भडका! पोलनिहाय कराची आकारणी
sakal

बोलून बातमी शोधा

karhad

वीज कंपनीची यावर काय भूमिका असणार? याकडे लक्ष लागून आहे. अधिभारावरून वीज कंपनी व पालिकेचा भडका उडणार हे मात्र निश्चित.

कऱ्हाड पालिका: वीज कंपनीत उडणार भडका

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा): केवळ आठ लाखांच्या थकीत वीजबिलासाठी पालिकेच्या कार्यालयासह पंपिंग स्टेशनचे वीज कनेक्शन कंपनीने तोडल्यानंतर पालिका व वीज कंपनीत ‘लेटर बॉम्ब’ सुरू आहे. पालिकेला बदनाम करण्यासाठी त्यात राजकारण झाल्याचाही आरोप होतो आहे. पालिकेनेही वीज कंपनीकडून पोलनिहाय कर आकारणी व वीजवाहक तारांखालील जमिनीच्या कराचा अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. वीज कंपनीची यावर काय भूमिका असणार? याकडे लक्ष लागून आहे. अधिभारावरून वीज कंपनी व पालिकेचा भडका उडणार हे मात्र निश्चित.

हेही वाचा: कऱ्हाड पालिकेत इतिवृत्त बदलावरून खडाजंगी

पालिकेचे वीजबिल तब्बल आठ लाखांचे थकीत होते. वीज कंपनी व पालिकेत बोलणी सुरू होती. मात्र, वीज कंपनीने अचानक पालिकेचे वीज कनेक्शन तोडले. दोन तासांत वीजबिल भरल्याने ते जोडलेही गेले. मात्र, तोपर्यंत जिल्हाभर वृत्त पसरल्याने त्याची चर्चा झाली. पालिकेनेही त्याच दिवशी वीज कंपनीला विनापरवाना वृक्ष तोडल्याबद्दल व हेरिटेज वृक्षांचे नुकसान केल्याबद्दल प्रती वृक्ष एक लाखाच्या दंडाची आकारणी करण्याची नोटीस बजावली. तीन दिवसांत उत्तर न आल्यास वसुलीचा इशारा दिलेला होता. त्यावर वीज कंपनीने पालिकेचा नुकसान केल्याचा दावा धुडकावत वीज कंपनी कायद्यानुसार अधिकार असल्याचे कंपनीने उत्तरात स्पष्ट केले.

हेही वाचा: कऱ्हाड पुन्हा हादरलं! महिनाभरात तब्बल नऊ जणांचा खून

वीज वहिन्यांतील अडथळे दूर केले आहेत, त्यामुळे कशाचेही नुकसान झालेले नसल्याचा दावा त्यांनी केली. ‘लेटर बॉम्ब’चा प्रकार पालिकेने गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे वीज कंपनीला हे प्रकरण महागात ठरणार आहे. शहरात वीज कंपनीचे किती पोल आहेत, त्याचा सर्व्हे पालिकेने हाती घेतला आहे. पोलनिहाय त्या भाड्याची आकारणी, तेथील कर आकारणीची नोटीस पालिका बजावून वसुली करणार आहे. एका पोलवरून दुसऱ्या पोलवर वीज वाहक तार गेली तर त्याखालील जमीन बिनकामीच होते. त्याचीही जबाबदारी वीज कंपनीवर टाकून त्याही जमिनीची कर आकारणी वीज कंपनीकडून होणार आहे. पालिकेच्या सर्व्हेला नगरसेवकांचीही मान्यता आहे. त्यामुळे वीज कंपनीला वीज कनेक्शन तोडणे महागात पडणार आहे. त्यावर वीज कंपनीची काय भूमिका असणारे ते महत्त्वाचे आहे.

वीज कनेक्शन तोडण्यामागेही राजकारण

वीज कंपनीने ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या पुण्यतिथी दिनीच नेमके वीज कनेक्शन का तोडले, यामागे नेमके कोणाचे राजकारण आहे. पालिकेला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. त्याची सखोल चौकशी करावी, असा ठरावही पालिकेच्या मासिक बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी तो ठराव मांडला आहे. त्यासोबतच पालिकेने पोलनिहाय व जागानिहाय वीज कंपनीकडून अधिभार व कराची आखणी करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.

loading image
go to top