

Decisive Yet Kind: The Leader Maharashtra Will Miss
Sakal
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आणि माझा परिचय तसा जुना. मात्र तो अधिक घट्ट झाला, जेव्हा मी बारामती येथे प्रांत अधिकारी म्हणून कार्यरत होतो. त्या काळात अजित पवार यांना जवळून पाहण्याची, त्यांच्या कामाची पद्धत अनुभवण्याची संधी मिळाली. पुढे पुणे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आणि राज्य शासनात कृषी, सहकार आणि फलोत्पादन विभागाचा सचिव म्हणून जबाबदारी सांभाळताना, त्यांच्या कार्यशैलीचा प्रत्यक्ष अनुभव वारंवार आला.
- शिवाजीराव देशमुख, माजी महासंचालक, ‘व्हीएसआय’