

A Leader Defined by Work, Not Words
Sakal
दादा म्हणजे कामाचा झपाटा होते... वादळ होते... झंझावात होते... वेळेची कदर करणारे नेते होते...! वीज कडकडावी, अवघा आसमंत प्रकाशमान व्हावा आणि अवघ्या काही क्षणांत पुन्हा काळोख दाटावा, तसे काहीसे दादांच्या जाण्याने झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा अजित पवार यांच्या उल्लेखाशिवाय तो पूर्ण होऊ शकणार नाही. धर्मनिरपेक्ष विचारधारेला राजकारणाच्या अंगणात भविष्यात मोठी ताकद देणारा नेता म्हणून उद्याचा त्यांचा वावर दिलासा देणारा ठरला असता; परंतु आता सारे संपले असल्यासारखे वाटते.
- मकरंद पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री