खंडाळा कारखान्याचा बिगूल वाजला ; 17 ऑक्टोबरला निवडणूक

सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार
khandala
khandalasakal

लोणंद (सातारा) : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगूल वाजला असून, या कारखान्याच्या एकूण २१ जागांसाठी १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्या वतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.

खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. खंडाळा- म्हावशीच्या २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम यापूर्वी जाहीर झाला होता. १७ जानेवारी २०२० रोजी मतदार याद्या प्रसिद्ध होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या २२ ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीपर्यंतचे अर्ज दाखल करण्याचे तीन दिवसही पूर्ण झाले होते.

मात्र, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्यावर ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत स्थगित करण्याच्या शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली होती. दरम्यान, शासनाने निवडणुकीला स्थगिती दिलेली मुदत संपुष्टात आल्याने आणि निवडणुका पुढे ढकललेल्या कालावधीपासून सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्या वतीने नव्याने सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवार (ता. २०) व मंगळवारी (ता. २१) सकाळी ११ ते ३ या वेळेत खंडाळा तहसीलदार कार्यालयातील निवडणूक कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता दाखल अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

khandala
कऱ्हाड-पुणे थेट एसटी बससेवा

बुधवारी (ता. २२) अर्जाची छाननी प्रक्रिया, तर गुरुवारी (ता. २३) सकाळी ११ वाजता वैध ठरलेल्या अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ता. २३ सप्टेंबर ते ता. ७ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप (ता. ८) ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत होणार आहे. आवश्यक वाटल्यात ता. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. ता. १९ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.

त्याच दिवशी विजयी उमेदवार घोषित करण्यात येणार आहेत. कारखान्याच्या एकूण २१ संचालकांपैकी व्यक्ती उत्पादक खंडाळा, शिरवळ, बावडा, भादे व लोणंद या पाच गटांमध्ये प्रत्येकी ३ असे एकूण १५ संचालक, महिला राखीव गटातून दोन महिला संचालक, तर संस्था व बिगर उत्पादक सभासद प्रतिनिधी, अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी, इतर मागास मतदार प्रवर्ग प्रतिनिधी, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून प्रत्येकी एक संचालक असे एकूण २१ निवडून द्यायचे आहेत. इच्छुकांनी उमेदवारी अर्जाची १०० रुपये फी भरून अर्ज खरेदी करून वेळेत अर्ज दाखल करावेत.

अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी ३०० रुपये, तर इतर उमेदवारांसाठी १००० रुपये अनामत शुल्क राहील. मतदार यादी उपविधी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सशुल्क मिळेल. मतदानाचा दिवस वगळून निवडणूक कामकाज सार्वजनिक व शासकीय सुटी दिवशी बंद राहील, अशी माहिती श्री. जगताप यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com