कास पठारावरील पुरावा नष्ट करण्यात अज्ञात अखेर यशस्वी; शोध लागणार का?

पुरावा नष्ट करण्यात यश मिळवल्याचे बोलले जात आहे.
Satara
SataraSakal
Updated on

कास : जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराच्या निसर्गरम्य परिसरात २० ऑक्टोबर रोजी अज्ञातांनी जैविक कचरा आणून जाळल्याबाबत ‘सकाळ’ने सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मोठी चर्चा झाली. या ठिकाणी अर्धवट जळालेल्या गोळ्या, औषधे मोठ्या प्रमाणात शिल्लक होती. मात्र, आज ज्या ठिकाणी कचरा जाळला, ते ठिकाण पुरावा नष्ट करण्याच्यादृष्टीने चकाचक करण्यात आले. त्यामुळे अज्ञाताने केलेले कृत्य लपवून पुरावा नष्ट करण्यात यश मिळवल्याचे बोलले जात आहे.

वीस ऑक्टोबर रोजी अज्ञातांनी गाडीभर औषधांच्या बाटल्या, गोळ्यांची पाकिटे व तर जैविक कचरा आणून कास परिसरातील पारांबे गावच्या हद्दीत जाळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले होते. रस्त्याच्या कडेलाच हा कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. येणाऱ्या-जाणाऱ्यांना याचा त्रास होत होता. शासकीय नियमाप्रमाणे अशा वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणे अपेक्षित असताना असा कचरा कास परिसरातील निर्जन ठिकाणी आणून जाळण्याच्या या प्रकारामुळे परिसराचे आरोग्य व सौंदर्य धोक्यात येत होते. पण, या प्रकाराबाबत शासकीय पातळीवरून काय कारवाई झाली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Satara
सातारा : राष्ट्रवादीत जागा मागणीवरून उफाळला वाद

संबंधित औषधांच्या पाकिटावर कंपनी व गोळ्यांची नावे होती. संबंधित विभागाने कचऱ्याची पाहणी करून नेमका दोषी कोण आहे? याचा शोध घेतला का, याबाबत जनता अनभिज्ञ आहे. या प्रकारातील सत्य बाहेर येण्याच्या आधीच जाळलेले ठिकाण स्वच्छ करण्याच्या या प्रकाराने संबंधित कृत्य करणारांचा शोध लागणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Satara
दिलासादायक! चाचण्या पॉझिटिव्ह येण्याच्या दरात घट

‘‘जैविक कचरा जाळला जातो काय? यावर आवाज उठवल्यावर जागा साफही केली जाते. प्रशासनाने या प्रकाराबाबत काय कारवाई केली, हे लोकांपुढे जाहीर करावे.’’

-ज्ञानेश्वर आखाडे, सदस्य, कास पठार कार्यकारी समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com