esakal | Koyna Dam: धरणाची पाणी पातळी झाली 2161 फूट 11 इंच
sakal

बोलून बातमी शोधा

Koyna Dam

Koyna Dam: धरणाची पाणी पातळी झाली 2161 फूट 11 इंच

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (सातारा): आज (ता.12) सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता धरणाची पाणी पातळी 2161 फूट 11 इंच झाली. या धरणामध्ये 103.19 TMC पाणीसाठा झाला आहे.

हेही वाचा: कोयना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं; गृहराज्यमंत्री आज करणार 'जलपूजन'

पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक अपेक्षित आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज (ता. 12) सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2 वाजता धरणाची वक्रद्वारे 1 फुट उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 10000 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. तसेच, धरणामधील आवक वाढल्यास सदर विसर्गामध्ये वाढ होणार असल्याने कोयना नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

loading image
go to top