सातारा : दुकान फोडून चोरट्यांनी पळविले चार लॅपटॉप

गिरीश चव्हाण
Friday, 16 October 2020

घटनास्थळाची पाहणी उपअधीक्षक आँचल दलाल यांनी करत तपासाच्या सूचना केल्या. याचा तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

सातारा : येथील केसरकर पेठेत असणाऱ्या लिनोव्हा स्टोअर कॉम्प्युटर वर्ल्ड हे दुकान फोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपये किमतीचे चार लॅपटॉप चोरून नेले. अर्कशाळेजवळील कोटेश्‍वर कॉलनीत हरीश वल्लभदास गुजर राहण्यास आहेत. त्यांचे केसरकर पेठेत लिनोव्हा स्टोअर कॉम्य्युटर वर्ल्ड नावाचे दुकान आहे. 

मंगळवारी दुकान बंद करून गुजर घरी गेले. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूस असणाऱ्या दार तसेच जाळी उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी आतील अडीच लाख रुपये किमतीचे चार लॅपटॉप चोरून नेले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुजर यांनी त्याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात नोदवली.

नवरात्रोत्सवात गरबा, दांडियाला बंदी : जिल्हाधिकारी शेखर सिंह

घटनास्थळाची पाहणी उपअधीक्षक आँचल दलाल यांनी करत तपासाच्या सूचना केल्या. याचा तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. 

Edited By : Siddhath Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft Of Four Laptop Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: