esakal | संकट काळातून बाहेर पडण्यासाठी कऱ्हाडातील 300 युवकांचे याेगदान
sakal

बोलून बातमी शोधा

blood donation

संकट काळातून बाहेर पडण्यासाठी कऱ्हाडातील 300 युवकांचे याेगदान

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोना काळात रक्ताची गरज असून, महावीर जयंतीनिमित्त येथे आयोजिलेल्या रक्तदान शिबिरात केवळ तीन तासांत 300 जणांनी रक्तदान केले. श्री संभवनाथ महाराज ट्रस्ट व श्री संभवजीन संगीत मंडळातर्फे शिबिराचे आयोजन केले होते. शहरात महावीर जयंतीनिमित्त बाबूभाई शहा सांस्कृतिक भवनात शिबिर झाले. या वेळी उपस्थित 300 रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. रक्तदान केलेल्या सर्वांना ट्रस्टतर्फे भेटवस्तू देण्यात आली.

आदर्श शहा, रुषभ शहा, संकल्प शहा, सागर शहा व नितीन शहा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जैन समाजातर्फे श्री संभवजीन संगीत मंडळ वेळोवेळी समाजकार्यात पुढाकार घेऊन कार्य करते. महावीर जयंतीनिमित्त त्यांनी शहरात रक्तदान शिबिर घेतले. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला.

Google ने कोरोना वाॅरियर्सला खास अंदाजात म्हटले Thank You

शिबिरास नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, लोकशाही आघाडीचे गटनेते नगरसेवक सौरभ पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे जयंत पाटील, नगरसेवक इंद्रजित गुजर, अतुल शिंदे, जयंत बेडेकर, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, मुकुंद चरेगावकर, पोपटराव साळुंखे, ललित राजापुरे, प्रमोद पाटील, नंदकुमार बटाणे, विजय मुठेकर, विजय यादव यांनी भेट दिली. सर्वांनीच संभवजीन संगीत मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. रक्तदान शिबिरास महालक्ष्मी ब्लड बॅंकेच्या संचालिका विना ढापरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

'केस मिटवून घ्या, नाही तर कोर्टात या'; कोरोनाच्या महामारीत 'बहुरुपी' अडचणीत

Don't Worry! साताऱ्यात उभारणार 'Oxygen Cylinder'चे पाच प्लॅंट; Covid रुग्णांना दिलासा

loading image
go to top