चाेरट्यांनी पळविले 45 हजारांचे कांदे; शेतकरी हतबल

किरण बाेळे
Sunday, 29 November 2020

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात भरत नाथबुवा नाळे, सुरेश विठ्ठल नाळे, सुनील विठ्ठल नाळे यांनी तक्रार दाखल केली आहे.

फलटण शहर : विडणी (ता. फलटण) येथील शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याच्या गोडावूनमधून 45 हजार रुपये किमतीच्या कांद्याच्या थैल्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. विडणी (25फाटा नाळे वस्ती) येथील भरत नाथबुवा नाळे, सुरेश विठ्ठल नाळे, सुनील विठ्ठल नाळे या शेतकऱ्यांनी घराशेजारी असणाऱ्या कांदा साठवून ठेवला हाेता. 

हा कांदा पत्र्याच्या शेड असलेल्या गोडाउनमधून तिघांचे 40 ते 45 हजार रुपये किमतीचा साठ ते 65 किलो वजनाच्या जवळपास एकटन वजनाचा हाेता. सुमारे 15 कांद्याच्या पिशव्या रात्रीच्या बारा ते एकच्या दरम्यान चोरट्यांनी गोडावूनमधून लंपास केल्या. दरम्यान, कुत्री भुंकण्याच्या आवाजाने संबंधित मालकाला जाग आल्यावर घराशेजारील कांद्याच्या पिशव्या चोरट्यांनी चोरून नेल्याचे मालकाच्या लक्षात आले.

आणखी बोलून चंद्रकांत पाटील यांना त्रास नाही देणार; जयंत पाटलांची काेपरखळी
 
पोलिस पाटील धनाजी नेरकर यांना घटनेची माहिती दिल्यावर पोलिस पाटील यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात कळवून फलटण ग्रामीण पोलिस ठाणेतील कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात भरत नाथबुवा नाळे, सुरेश विठ्ठल नाळे, सुनील विठ्ठल नाळे यांनी तक्रार दाखल केली आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves Stole Onion From Godown Near Vidni Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: