Satara Crime : वारीला गेलेल्या विहेतील दांपत्याच्या घरी चोरट्यांचा डल्ला
विहे येथील लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे वास्तव्यास असणाऱ्या आनंदराव गणपत मोरे यांच्या घरात शनिवारी रात्री दीडच्या सुमारास चोरी झाली. यात चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केल्यानंतर समोर असणाऱ्या दाराची कडी कटावणीने तोडून घरात प्रवेश केला.
House Robbed While Couple Attends Wari in Vihe Villagesakal
पाटण : वारीला गेलेल्या दांपत्याच्या घरी घरफोडी करत चौघांनी घरातील साडेआठ तोळे सोन्याचे दागिने व २० हजारांच्या रोकड लंपास केली. गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे दिसून आल्याने पोलिसांनी त्याद्वारे तपास सुरू केला आहे.