
खंडाळा : पुणे- सातारा महामार्गालगत असणाऱ्या बेंगरूटवाडी (खंडाळा) हद्दीत एका विहिरीत पडलेल्या मोराला खंडाळा तालुका रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी जीवदान दिले. विहिरीत उतरून घायाळ झालेल्या मोराला बाहेर काढून जंगलात सोडून दिले. या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.