घाबरु नका, काळजी घ्या! सातारा जिल्ह्यात 34 हॉटस्पॉट; प्रशासन सतर्क

घाबरु नका, काळजी घ्या! सातारा जिल्ह्यात 34 हॉटस्पॉट; प्रशासन सतर्क

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा, कोरेगाव, खटाव, माण, फलटण तालुक्‍यांत दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढू लागली आहे. माण, खटाव तालुक्‍यानंतर आता फलटण, कोरेगाव, कऱ्हाड, खंडाळा तालुक्‍यांत कोरोनाचे सर्वाधिक हॉटस्पॉट झाले आहेत. जिल्ह्यातील 34 हॉटस्पॉटमध्ये 20 दिवसांत एक हजारहून अधिक बाधित आढळल्याने आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे.
 
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सातारा, कोरेगाव, खटाव, माण, कऱ्हाड, खंडाळा तालुके हॉटस्पॉट ठरत आहेत. खटाव तालुक्‍यातील वडूज, कातरखटाव, नेर, पुसेगाव, बुध, डिस्कळ, सातारा तालुक्‍यातील मंगळवार पेठ, संभाजीनगर, गोडोली, शाहूनगर, सदरबझार, शाहूपुरी, कोरेगाव तालुक्‍यातील कोरेगाव, देऊर, अपशिंगे, सर्कलवाडी, माण तालुक्‍यातील दहिवडी, पळशी, गोंदवले, मार्डी, समर्थनगर, खंडाळा तालुक्‍यातील लोणंद, सांगवी, शिरवळ, पारगाव, खंडाळा, कऱ्हाड तालुक्‍यातील मलकापूर, शनिवार पेठ कऱ्हाड, फलटण तालुक्‍यातील तरडगाव, सांगवी, विडणी, आदर्की, कोळकी, शनिवार पेठ फलटण, लक्ष्मीनगर, पाटण तालुक्‍यातील विहे आदी हॉटस्पॉट ठरत आहेत. 

दिवसेंदिवस रुग्णांना भासतेय Oxygen बेड गरज; जाणून घ्या साता-याची स्थिती

गेल्या 20 दिवसांत (रविवारपर्यंत) दहिवडीत 46, वडूज 34, नेर 32, मंगळवार पेठ सातारा 26, सदरबझार 38, देऊर 35, सर्कलवाडी 22, लोणंद 71, सांगवी 26, शिरवळ 67, तरडगाव 109, कोळकी 25, विहे 30 आदी ठिकाणी उच्चांकी बाधित आढळून आले आहेत.

""जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, गेल्या 20 दिवसांत जिल्ह्यातील 34 हॉटस्पॉटमध्ये बाधितांची झपाट्याने वाढ झाली आहे. सातारा शहरातही बाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनास नागरिकांनी सहकार्य करून नियमांची अंमलबजावणी करावी.'' 

- डॉ. सचिन पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com