CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 342 नागरिक बरे झाले; 444 जणांचे नमुने तपासणीला

सिद्धार्थ लाटकर
Sunday, 23 August 2020

दरम्यान सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा कृष्णा -27, बी.जे. -  32, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब - 82, अँटी जन टेस्ट - 160, खाजगी लॅब - 44 असे सर्व मिळून 345 जणांचा अहवाल काेराेनाबाधित आला आहे. त्याचा तपशिल आज (रविवार, ता.23) दुपारपर्यंत येईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

सातारा : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 342 नागरिकांना दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. याव्यतरिक्त 444 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

आता कडुनिंब पळविणार कोरोनाला? कसे ते वाचा

सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 13, कराडतालुक्यातील 144, खंडाळा तालुक्यातील 25, खटाव तालुक्यातील 05, कोरेगाव तालुक्यातील 26,महाबळेश्वर तालुक्यातील 15, माण तालुक्यातील 4, पाटण तालुक्यातील 17, फलटण तालुक्यातील 16, सातारा तालुक्यातील 60, वाई तालुक्यातील 17 असे एकूण 342 नागरिकांचा समावेश आहे.

शिवेंद्रसिंहराजेंनी मागताच अजित पवारांकडून श्री गणेशा, सातारा जिल्ह्यातील या मोठ्या प्रकल्पासाठी 57 कोटी मंजूर    

444 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्वर्गीय क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 12, कोरेगाव 30, खंडाळा येथील 90, मायणी येथील 22, महाबळेश्वर येथील 7, पानमळेवाडी 60, खावली येथील 160  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 63 असे एकूण 444 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील 361 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; आठ नागरिकांचा मृत्यू 

भाविकांचे श्रध्दास्थान श्री शंकर पार्वती गणपती (महादेव) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Hundred Forty Two Citizens Recovered From Covid 19 In Satara