Karad Crime
Sakal
सातारा
Karad Crime : 'कऱ्हाडमध्ये युवकांच्या राड्यात तिघे जखमी'; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
Karad clash: जखमी युवकांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राडा कशामुळे झाला, नेमके कोण सहभागी होते, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली जात असून काही संशयितांची ओळख पटली आहे.
कऱ्हाड : शहरात आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सोमवार पेठेतील दोन गटांत राडा झाला. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे होते. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पेठेतील कुंभार गल्लीमध्ये आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा गल्लीत वाढदिवस साजरा करण्यात येत होता.

