गोळीबार करणारे अल्पवयीन

वाईतील तिघेही ताब्यात; बदल्यासाठी साथीदारांनी पाडले भाग
Three minors involved in shooting case in Satara
Three minors involved in shooting case in Satara
Updated on

सातारा - वाई येथील युवकाचा येथील नटराज मंदिरासमोर बोलावून गोळ्या घालून खून केल्याच्या प्रकरणात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून, पूर्वीच्या भांडणाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य त्यांना करायला भाग पाडणाऱ्या दोन साथीदारांची नावेही तपासात समोर आली आहेत.

येथील नटराज मंदिरासमोर अर्जुन मोहन यादव (वय २६, रा. लाखानगर, वाई, जि. सातारा) याचा शनिवारी (ता. २) डोक्यात गोळी घालून खून करण्यात आला. तडीपार असलेला अर्जुनला शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास नटराज मंदिराजवळ बोलावून घेण्यात आले होते. या मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना त्याच्यावर गोळीबार झाला. या प्रकाराने साताऱ्यात खळबळ उडाली होती.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली, तसेच संशयितांना तातडीने पकडण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिले होते. त्यांनी ‘एलसीबी’ची दोन पथके या संशयितांच्या मागावर सोडली होती. वार्इमध्ये पाठवलेल्या पथकाला या खुनामागे तीन अल्पवयीन मुले असल्याचे समजले. ही तिन्हीही मुलांना वाईतून ताब्यात घेण्यात आले.

या गुन्ह्यामध्ये आणखी दोघांचा समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे. ते पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे, तसेच अर्जुनने १३ मे २०२० ला अभिजित ऊर्फ भैया शिवाजी मोरे (रा. गंगापुरी, वार्इ) याच्यावर गोळीबार केला होता. त्यात तो जखमी झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठीच हा खून झाल्याचेही तपासात पुढे आले आहे.

अवघ्या ४८ तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल अधीक्षक बन्सल यांनी ‘एलसीबी’चे कौतुक केले. पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार संजय शिर्के, विजय कांबळे, आतिष घाडगे, विश्वनाथ संकपाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, मुनीर मुल्ला यांनी या कारवाईत भाग घेतला.

फ्रेंड रिक्वेस्टमध्ये अडकला अन् जीव गमावला

अर्जुन याला तडीपार करण्यात आले होते. तो जिल्ह्यातून बाहेर राहात होता. त्यामुळे संशयितांना त्याला गाठणे कठीण झाले होते. अनेक प्रयत्न करूनही तो हाताला येत नव्हता. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाववरून मुलीची बनावट फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवून अर्जुनला जाळ्यात ओढले. त्यात अर्जुन अडकला. संशयितांनी मुलगी बोलतेय असे भासवून अर्जुनला भेटायला बोलावले व त्याचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com