Phaltan News: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! आई-वडिलांसोबत झोपलेल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचा श्वानाच्या हल्ल्यात मृत्यू, नेमकं काय घडलं..

Stray Dog Attack in Phaltan Raises Fresh Public Safety Concerns: फलटणमध्ये भटक्या श्वानांचा जीवघेणा हल्ला; तीन महिन्यांच्या चिमुकलीचा अतिरक्तस्रावाने मृत्यू
Phaltan Stray Dog Attack Three Month Old Infant Dies Due to Severe Blood Loss While Sleeping Beside Her Parents

Phaltan Stray Dog Attack Three Month Old Infant Dies Due to Severe Blood Loss While Sleeping Beside Her Parents

sakal

Updated on: 

फलटण : आई- वडिलांच्या कुशीत सुरक्षित झोपलेल्या अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचा श्‍वानांच्‍या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना फलटणच्‍या महात्मा फुले चौकात आज सकाळी उघडकीस आली. आई- वडिलांसह झोपलेल्या बालिकेवर कुत्र्याने हल्ला करून चावा घेतल्याने तिला गंभीर दुखापत झाली. या जखमांमधून झालेल्या अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...