TET परीक्षेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार! आयुक्त सुपेंनी लाटले 1.70 कोटी

Tukaram Supe
Tukaram Supeesakal
Summary

आरोग्य विभागातील भरती परीक्षा आणि म्हाडा परीक्षा पेपरफुटीची चर्चा सुरू असतानाच शिक्षक पात्रता परीक्षेतील मोठा घोटाळा समोर आलाय.

टीईटी परीक्षेत गैरप्रकार (Maha TET Exam) झाल्याच्या संशयावरुन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक करण्यात आलीय. पुणे पोलिसांनी त्यांना याबाबत चौकशीसाठी बोलावलं होतं. म्हाडा पेपर फुटी प्रकरणात (Mhada Paper Scam) अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख (Pritish Deshmukh) याच्या घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केलाय. पुणे सायबरच्या कार्यालयांमध्ये ही चौकशीकरुन अटक करण्यात आलीय.

आरोग्य विभागातील भरती परीक्षा आणि म्हाडा परीक्षा पेपरफुटीची चर्चा सुरू असतानाच शिक्षक पात्रता परीक्षेतील मोठा घोटाळा समोर आलाय. राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुपे यांनी परीक्षा घेणाऱ्या जी. ए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक देशमुख याला हाताशी धरून टीईटी परीक्षेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून पुणे पोलिसांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केलाय. आरोग्य विभागातील भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना पुणे पोलिसांच्या हाताला पेपरफुटी प्रकरणातील मोठे मासे गळाला लागलेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (Maharashtra State Examination Council) महाटीईटी आणि शिष्यवृत्ती परीक्षांचं आयोजन केलं जातं. बीएड आणि डीएड झालेल्या विद्यार्थ्यांची शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test Maharashtra) घेतली जाते. विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षेची जबाबदारी असलेल्या तुकाराम सुपे यांनाच अटक झाल्यानं टीईटी परीक्षेसंदर्भात कुंपणंच शेत खालल्याचा संशय निर्माण झालाय.

Tukaram Supe
बेळगावात आणखी एका पुतळ्याची विटंबना, 27 जणांना अटक

म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख याच्यासह एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांची चौकशी करत असताना त्यांनी 2019-2020 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता (TET) परीक्षेत विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन निकाल बदलल्याचं सांगितलं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागातील सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या मदतीने हे केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी 16 डिसेंबर रोजी तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांची सायबर सेल पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्यांनी घोटाळ्याची कबुली दिलीय.

Tukaram Supe
राष्ट्रवादी, सेनेच्या आमदारांसाठी प्रतिष्ठेची लढत

आरोग्य विभागाच्या (Department of Health) गट क आणि गट ड प्रवर्गाच्या भरतीप्रक्रियेत मोठा गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. आरोग्य विभागाच्या भरतीत विभागातील अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलीय. तर, म्हाडा परीक्षेचं आयोजन करण्याची जबाबदारी असलेल्या सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रीतिश देशमुखला अटक करण्यात आलीय. त्यानंतर आता थेट टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराच्या संशयावरुन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना अटक करण्यात आल्याचं समोर आलंय. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत पास करण्याचं आश्वासन देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी 50 ते 1 लाख अशा रकमा घेतल्या. या माध्यमातून जवळपास 4 कोटी 20 लाख रुपये जमा झाले होते. हे पैसे आरोपींनी आपआपसात वाटून घेतले. यात तुकाराम सुपे यांनी 1.70 कोटी, प्रितीश देशमुख 1.25 कोटी, अभिषेक सावरीकर 1.25 कोटी घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर (Abhishek Savrikar) यांनी गुन्ह्याची कबुली देताना हे सांगितलं. पेपरफुटीचा तपास करत असतानाच म्हाडाच्या परीक्षेतील पेपर फोडला जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सायबरसेलला मिळाली होती. म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना अटक केल्यानंतर आता टीईटी परीक्षेत घोटाळा केल्याचं समोर आलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com