

Malkapur Accident
मलकापूर : पंक्चर झाल्याने महामार्गाकडेला उभ्या केलेल्या कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्यशाने झालेल्या अपघातात सुरक्षा गार्ड लावण्यासाठी आलेल्या दोन महामार्ग कर्मचाऱ्यांसह ट्रक चालक गंभीर जखमी झाले. पुणे- बंगळूर महामार्गावर येथील एन. पी. मोटर्ससमोर कालरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.