
कास : वजराई धबधब्यावर शेवटच्या तिसऱ्या टप्प्यात जिथे धबधबा कड्यातून शेवटच्या ठिकाणी कोसळतो, अशा प्रतिबंधित क्षेत्रात काही उत्साही तरुण जात आपला जीव धोक्यात घालत आहेत. अतिउत्साहाच्या भरात आणि काही तरी वेगळे करण्याच्या थ्रीलरच्या नादात तरुणाई पुढे धोका असूनही दुर्लक्ष करीत आहेत.