

Brave Colleagues Save Forest Worker After Gaur Attack
Sakal
कास : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बामणोली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मालदेव नियतक्षेत्रात रानगव्याने केलेल्या हल्ल्यात वनमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सुभाष तुकाराम गुरव (वय-४५) असे जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. गस्त घालत असताना अचानक समोर आलेल्या रानगव्याने त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना शनिवार (दि.२०) दुपारी घडली.