Pune Satara Highway: टोल सुरू, पण रस्ता बेहाल! पुणे-सातारा महामार्गावर प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत, गडकरीसाहेब... नको नाराजी, हवी कारवाई

Toll collection despite poor road conditions: टोल वसुली सुरूच, पण पुणे-सातारा महामार्ग खड्डेमय; रखडलेली कामे, वाढते अपघात आणि प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत, गडकरींच्या नाराजीनंतर ठोस कारवाईची मागणी
Nitin Gadkari Acknowledges Highway Issues; Commuters Seek Accountability

Nitin Gadkari Acknowledges Highway Issues; Commuters Seek Accountability

sakal

Updated on

-संजय शिंदे

पुणे- सातारा महामार्गावरील खड्डे आणि रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या दुरवस्थेबद्दल केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी पुणे- सातारा रस्ता मला शापासारखा मिळाला आहे, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. मात्र, रखडलेल्या या महामार्गाच्या कामांमुळे अपघात होऊन अनेकांचे जीव गेले. अनेक जण कायमचे जायबंदी झाले. त्याचे काय? महामार्गाच्या कामाच्या विलंबासाठी जबाबदार कोण? कंत्राटदार, संबंधित यंत्रणा यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होणार, याकडे जनतेचे लक्ष आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com