esakal | गावी जाणाऱ्या गणेशभक्तांनाे... तुमच्यासाठी टाेलमाफ, अट वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

गावी जाणाऱ्या गणेशभक्तांनाे... तुमच्यासाठी टाेलमाफ, अट वाचा

गणेशभक्तांच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून टोलनाक्‍यावर गणेशभक्तांसाठी दोन लेन मोकळ्या सोडाव्यात, नव्याने लेन वाढवण्याचा प्रयत्न करावा, टोलनाक्‍याच्या दोन्ही बाजूला एक किलोमीटर परिसरात तात्पुरते प्लॅस्टिकची बॅरेकेटस्‌ लावावेत अशा सूचना केल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

गावी जाणाऱ्या गणेशभक्तांनाे... तुमच्यासाठी टाेलमाफ, अट वाचा

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : गणेशोत्सवासाठी मुंबईसह इतर जिल्ह्यांतून पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतून ई पास घेऊन येणाऱ्या गणेशभक्तांना सर्व टोलनाक्‍यांवर टोल माफ करण्यात आला आहे. या भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी टोलनाक्‍यावर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.
 
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई, ठाणे, नवीन मुंबई, पनवेल, तसेच उपनगरातून मोठ्या प्रमाणात भाविक सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांत येतील. या गणेशभक्तांना येताना वाहतूक कोंडीसह इतर कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आज सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला पाच जिल्ह्यांतील सर्व अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. पुणे, मुंबईतून येणाऱ्या भाविकांना चार ते पाच टोलनाक्‍यांवरून यावे लागते. त्यासाठी गणेशभक्तांनी येताना पोलिसांकडून ई- पास घेऊनच यावे लागेल. ई- पास असलेल्या भाविकांना या सर्व टोल नाक्‍यावर टोलमाफी असेल, अशी माहिती श्री. देसाई यांनी दिली.

पीकविमा योजनेत स्ट्रॉबेरीचा समावेश झाल्याने शेतकरी आनंदित

खेड शिवापूर ते सारोळा या दरम्यानच्या महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना महामार्ग प्राधिकरणाऱ्या अधिकाऱ्यांना केली आहे. गणेशभक्तांच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून टोलनाक्‍यावर गणेशभक्तांसाठी दोन लेन मोकळ्या सोडाव्यात, नव्याने लेन वाढवण्याचा प्रयत्न करावा, टोलनाक्‍याच्या दोन्ही बाजूला एक किलोमीटर परिसरात तात्पुरते प्लॅस्टिकची बॅरेकेटस्‌ लावावेत, सातारा जिल्ह्यातून कऱ्हाड, कोयना, पाटण, चिपळूणमार्गेही काही गणेशभक्त कोकणात जाणार आहेत. त्यांच्यासाठी कुंभार्ली घाटात दोन तपासणी नाके सुरू करावेत आदी सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

गुलाबी रंगाच्या पर्सची का हाेतेय चर्चा.. वाचा सविस्तर

कुस्ती मल्लविद्या महासंघावर सागर साळुंखे

शिवापूर ते सारोळा या महामार्गाची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे महामार्गाच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत दम भरला असल्याचे सांगून देसाई म्हणाले, ""पूर्वीच्या पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याबाबतची नोटीस दिली होती. त्या नोटिशीचे पुढे काय झाले हे नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी शोधावे. महामार्गाचे येत्या दोन-चार दिवसांत पॅचवर्क पूर्ण करण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातून रेमेडिसिव्हर इंजेक्‍शनच्या चोरीची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असेही त्यांनी सांगितले. 

जाणून घ्या... डाॅ. नरेंद्र दाभाेलकरांच्या या पैलूंविषयी 

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता रुग्णांवर उपचार मिळण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे सातारा शहरातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलाचा काही भाग कोविड हॉस्पिटल म्हणून घेण्याचा विचार सुरू आहे. 

- शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री 

Edited By : Siddharth Latkar

loading image