
रहिमतपूर : शिरंबे (ता. कोरेगाव) येथे रहिमतपूर- कोरेगाव रस्त्यावर काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॉलीतील उसाच्या मोळ्या पडून ट्रॅक्टर चालक अविनाश हनुमंत कुंभार (वय २१, रा. बोरडा, ता. कळंब, जि. धाराशिव, सध्या रा. सुर्ली ता. कोरेगाव) याचा मृत्यू झाला आहे.