वाईतला कोरोना कंटेन्मेंट झोन शिथिल करा; व्यापाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Containment Zone

वाईतला कोरोना कंटेन्मेंट झोन शिथिल करा

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (सातारा) : शहरात लागू केलेला कोरोना कंटेन्मेंट झोन (Corona Containment Zone) (प्रतिबंधित क्षेत्र) शिथिल करण्यात यावा, अशी मागणी वाई व्यापारी (Traders) महासंघाच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ-जगताप (Vidyadevi Pol-Jagtap) यांना देण्यात आले. (Traders Demand Cancellation Of Corona Containment Zone In Wai City)

28 एप्रिलपासून वाई शहर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. तेंव्हापासून आजपर्यंत शहरातील अत्यावश्‍यक सेवा वागळता सर्व आस्थापना, दुकाने, व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. कोरोना महामारीमुळे गेले वर्षभर सर्व व्यापारी अत्यंत अडचणीत आले आहेत. विशेषतः छोटा व्यापारी वर्ग आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी महासंघाचे अध्यक्ष सचिन फरांदे, उपाध्यक्ष उमेश शहा, अजित वनारसे, सचिव अशोक लोखंडे, सहसचिव भवर ओसवाल, खजिनदार हेमंत येवले उपस्थित होते.

निराधार, कष्टकऱ्यांसाठी 'आई'चा आधार, भुकेल्यांसाठी भरविला जातोय मायेनं 'आहार

Traders Demand Cancellation Of Corona Containment Zone In Wai City

loading image
go to top