
म्हसवड : हौसेला मोल नसते. मग कृषी संस्कृती जपणाऱ्या भारतात बळीराजा आपल्या परिवाराची नाही, तर कृषीसाठी लागणाऱ्या सर्व घटकांची काळजी घेत असतो. कृषी संस्कृतीचा महत्त्वाचा घटक असलेल्या गायीचे डोहाळे जेवण शेतकऱ्याने एखाद्या लग्नासारखे केले. शेकडो लोकांच्या पंगती बसल्या. गायीला पंचारतीने ओवाळण्यात आले. महिलांनी तिला गोग्रास भरवला अन् ओटीपूजन केले. आठवणीतील क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात आले. देशी गायीबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या वाकी (ता. माण) येथील या अनोख्या डोहाळे जेवणाची परिसरात चांगलीच चर्चा आहे.