घाटरस्त्यात दरडी कोसळल्याने धोका वाढला; मालोशी-घाटेवाडीत वाहतुकीलाही अडथळा

घाटरस्त्यात दरडी कोसळल्याने धोका वाढला; मालोशी-घाटेवाडीत वाहतुकीलाही अडथळा
Updated on

तारळे (ता. सातारा) : पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे मालोशी ते घाटेवाडीदरम्यान असणाऱ्या घाटरस्त्यात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. शिवाय झाडवेली व झुडपांचे वळणावर प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीस अडथळा होत असून अपघातालाही निमंत्रण मिळत आहे. पावसाळा संपून दोन महिने झाले तरीही संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. या दरडी त्वरित हटविण्याची मागणी ग्रामस्थ व प्रवासी करत आहेत.
 
मालोशी ते घाटेवाडी हा सुमारे सहा किलोमीटरचा घाटमार्ग आहे. पाडेकरवाडी, डोणी व घाटेवाडी आदी गावांना तारळेत येण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या मार्गात काही ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सातारा तालुक्‍यातील मोरेवाडी व पवारवाडीतील ग्रामस्थांचीही येथून रहदारी असते. तसेच साताऱ्याकडून तारळी धरणाकडे पर्यटनासाठी येणारे पर्यटक व तारळेकडून तारळी धरण व ठोसेघर धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा महत्त्वाचा असणारा हा मार्ग धोकादायक झाला आहे. रस्त्याच्या वळणांवर झाडवेली व झुडपांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. समोरून येणारे वाहनही दृष्टीस पडत नसल्याने समोरासमोर वाहने धडकण्याचा धोका वाढला आहे. शिवाय रस्त्यात खड्डेच खड्डे आहेत. त्याचीही डागडुजी होणे आवश्‍यक आहे. रात्रीच्या दरम्यान हा धोका आणखी गडद झाला आहे. 

या विभागात कायम अतिवृष्टी असते. प्रचंड पावसाने दरवर्षी रस्त्याचे व घाटमार्गात अनेक अडथळे उभे राहतात. पावसाळी पार्श्वभूमीवर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे असताना बांधकाम विभाग सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. घाटातील नाले गाळ व मातीने भरून गेले आहेत. परिणामी, पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून रस्ता खराब झाला आहे, तर प्रचंड पावसाने दरडीही कोसळल्या आहेत. मोठे दगड रस्त्याकडेला ठाण मांडून आहेत. रस्त्याकडेची झाडेझुडपेही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत. त्याचा नाहक त्रास पर्यटक व प्रवाशांना होत आहे. या ठिकाणच्या दरडी हटविण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

अतिवृष्टीची भरपाई देवदिवाळीला तरी द्या; शेतकऱ्यांचे प्रशासनाला साकडे
 
लॉकडाउननंतर वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, घाटमार्गातील रस्ता, दरडी, वळणांवरील झुडपांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. बांधकाम विभागाने त्याची तातडीने दखल मार्गातील धोके हटवावेत. 
-सागर पाटील, प्रवासी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com