Satara–Pune Highway
esakal
दिवाळी सुट्टीनंतर पुणे–मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी झाली आहे.
खंडाळा परिसरात पुलाच्या अरुंद रस्त्यामुळे कोंडी निर्माण झाली आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, पर्यायी मार्गांचा वापर सुचवला आहे.
खंडाळा (सातारा): दिवाळी सुट्टीचा आनंद घेतलेले चाकरमानी आता पुन्हा कामावर परतण्यासाठी पुणे आणि मुंबईकडे निघाले (Heavy Traffic on Satara–Pune Highway) आहेत. त्यामुळे साताराहून पुण्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रविवारी सकाळपासूनच खासगी वाहने, एसटी बस आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची वाहतूक वाढली असून, महामार्गावर वाहतुकीचा ताण जाणवत आहे.