
पाटण : पाटण- सडावाघापूर- तारळे मार्गावर म्हावशी गावच्या हद्दीत गुजरवाडी घाटात मोटार दरीत कोसळून एक जण गंभीर जखमी झाला. प्रसंगावधान राखत किंगमेकर ॲकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी व पोलिसांनी खोल दरीतून जखमी युवकास बाहेर काढून कऱ्हाडमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. साहिल अनिल जाधव (वय २०, रा. कापील गोळेश्वर, ता. कऱ्हाड) असे जखमी युवकाचे नाव आहे.