
कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा (ता. कऱ्हाड) येथे टेंपो व दुचाकी अपघातात दुचाकीवरील दोन युवती जागीच ठार झाल्या. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. टेंपोच्या मागील चाकाखाली त्या सापडल्याने त्या जागीच ठार झाल्याचे सांगण्यात आले. करिष्मा ऊर्फ प्राजक्ता कृष्णत कळसे (वय २७, रा. रेठरे खुर्द, ता. कऱ्हाड) व पूजा रामचंद्र कुऱ्हाडे (वय २५, रा. येरवळे, ता. कऱ्हाड) असे मृत युवतींची नावे असल्याचे तालुका पोलिसांनी सांगितले.