
कोरेगाव : आझादपूर (ता. कोरेगाव) येथे काल सायंकाळी काम करताना विहिरीत पडलेल्या २२ वर्षीय ठेकेदार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शोधण्यात शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सला आज सकाळी ११ वाजता यश आले. विलास अशोक चव्हाण (वय २२, रा. ड्याबेरी, ता. जि. विजापूर, राज्य कर्नाटक) असे ठेकेदाराचे नाव आहे.