

Devotion Turns Tragic: Two Killed, Three Injured in Car Accident
esakal
म्हसवड: माण तालुक्यातील म्हसवड शहरालगत धुळदेव गावच्या हद्दीत आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सातारा येथील डॉ. क्रांतिसिंह रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.