Accidental Death : महामार्गावरील अपघातात एक जागीच ठार तर एक गंभीर ; टेंपोची महामार्गावरील टॅंकरला पाठीमागून जोरदार धडक
Satara Accident News : अपघातग्रस्त आयशर चालक हा कोल्हापूर बाजूने पुण्याकडे निघाला होता. मधल्या प्रवासात किरण गाडीत बसला होता. म्हसवे गावच्या हद्दीत टेंपोने महामार्गावर उभ्या असलेल्या टॅंकरला पाठीमागून जोरदार धडक दिली.
A tragic collision on the highway involving a tempo and tanker left one person dead and another seriously injured.Sakal
पाटखळ : पुणे- बंगळूर महामार्गावर म्हसवे (ता. सातारा) हद्दीत डीमार्टसमोर टेंपोने टॅंकरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात टेंपोमधील वाळवा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील युवकाचा मृत्यू झाला असून, चालक जखमी झाला आहे.